अनुवांशिक उत्परिवर्तन : कमी जेनेटिक म्युटेशनमुळे माणूस बनतो दीर्घायुष्यी | पुढारी

अनुवांशिक उत्परिवर्तन : कमी जेनेटिक म्युटेशनमुळे माणूस बनतो दीर्घायुष्यी

लंडन : जगात वेगवेगळ्या प्राण्यांचा जीवनकाळ वेगवेगळा का आहे? माणूस सरासरी 80 वर्षे जगतो आणि जिराफ केवळ 24 व्या वर्षीच का मरतो? या विषयावर अलीकडेच केम्बि—जमध्ये वेलकम सेंगर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करण्यात आले. त्याची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. सुमारे सोळा प्रजातींच्या जेनेटिक म्युटेशनच्या (जनुकीय परिवर्तन) अभ्यासातून हे समोर आले आहे की दीर्घ किंवा छोट्या आयुष्यामागे म्युटेशन होण्याचा दर आणि अनुवंशिक कारणे महत्त्वाची असतात. कमी जेनेटिक म्युटेशन हे दीर्घायुष्याला योगदान देते. माणसाला एका वर्षात केवळ 47 म्युटेशनचा सामना करावा लागतो, असेही यामधून दिसून आले आहे.

दीर्घायुष्य जगणारे प्राणी म्युटेशनला धीमे करतात. त्यांच्या दीर्घ जीवनकाळामध्ये या गोष्टीचे योगदान मोठे असते. प्राण्यांमध्ये जनुकीय परिवर्तनांच्या एका समान पॅटर्नला एकमेकांपासून उंदीर आणि वाघाच्या रूपात वेगळे करणे आश्‍चर्यकारक असते. मात्र, ही निसर्गाची किमया घडत जात असते. सोमेटिक म्युटेशन वय वाढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. माणूस आणि अन्य प्राण्यांमधील फरक समजून घेत असताना हे लक्षात घ्यावे की माणसाला एका वर्षात केवळ 47 म्युटेशनचाच सामना करावा लागतो.

उंदरांचे आयुष्य केवळ 3.7 वर्षांचे असते आणि ते दरवर्षी 796 म्युटेशनचा सामना करतात. माणसाचे सरासरी आयुष्य 70 ते 80 वर्षांचे असते. सोमेटिक म्युटेशन अधिक झाल्याने शरीरातील पेशी खराब होऊ लागतात. त्यामुळे कर्करोगाचाही धोका संभवतो. मोठ्या प्राण्यांमध्ये कर्करोगाची जोखीम कमी करण्याची क्षमता कमी असते.

दोन वर्षांनी पुन्हा एकदा दख्खनचा राजा न्हाऊन निघाला गुलालात | Shree Jotiba yatra

 

Back to top button