जपानी मुले सर्वाधिक तंदुरुस्त | पुढारी

जपानी मुले सर्वाधिक तंदुरुस्त

टोकियो: जपानी मुलांना जगात सर्वात जास्त तंदुरुस्त मानले जाते. मेडिकल जर्नल ‘लॅसेंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील निष्कर्षांनुसार, जर एखाद्या मुलाचा जन्म जपानमध्ये झाला असल्यास ते जास्त तंदुरुस्त आणि दीर्घायुषी होण्याची शक्यता बळावते. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे जपानमधील राहणीमान आणि तेथील खाण्याची पद्धत.

जगभरात सध्या मुलांमध्येही लठ्ठपणा आणि मधुमेहाचे प्रमाण वाढू लागले आहे. यासंदर्भातील आकडेवारीचा विचार केल्यास, जपानमध्ये अशी मुले एकदम कमी असल्याचे स्पष्ट झाले. जपानी मुलांच्या तंदुरुस्तीचे रहस्य शाळेत जाताना देण्यात येणार्‍या लंच बॉक्समध्ये दडले आहे. जपानमधील मुलांना जेवणाच्या डब्याशिवाय शाळेला पाठवण्यात येत नाही. याशिवाय या डब्यांमध्ये असे खाद्यपदार्थ देण्यात येतात की, त्यात कॅलरीज कमी असाव्यात आणि जास्त पोषक असेल. तसेच ते सहजपणे पचले जाईल.

जपानी मुलांच्या लंच बॉक्समध्ये बेक केलेला मासा, स्वीट कॉर्न, सूप आणि दूध यासह कमी फॅट असणारे खाद्यपदार्थ देण्यात येतात. या देशात बहुतेक खाद्यपदार्थ शिजवून तयार केलेले असतात. तसेच त्यांच्या खाण्यात चरबी कमी आणि पोषक घटक जास्त असतात. याशिवाय यामध्ये स्थानिक पातळीवर मिळणारी फळे, भाज्या यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला असतो.

हेही वाचलंत का? 

Back to top button