भारतात आहे गूढ ‘लेक ऑफ नो रिटर्न्स’!

भारतात आहे गूढ ‘लेक ऑफ नो रिटर्न्स’!

नवी दिल्‍ली : जगात काही रहस्यमय ठिकाणे आहेत ज्याबाबत सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही कुतुहल कायम आहे. बर्म्युडा ट्रँगलसारखी ही ठिकाणे आजही लोकांना रहस्यमयच वाटतात. आपल्या देशातही असेच एक ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे एक तलाव असून तो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. या तलावाचे नावच 'लेक ऑफ नो रिटर्न्स' असे आहे. अर्थात हे त्याचे खरे नाव नसून 'नावांग यांग' असे त्याचे खरे नाव आहे. मात्र, तिथे गेलेला परत येत नाही असा समज असल्याने त्याला हे नाव पडले आहे!

हा तलाव अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चांगलांग जिल्ह्यात आहे. याठिकाणी बहुतांश टांगस जमातीचे लोक राहतात. असे म्हणतात की दुसर्‍या जागतिक महायुद्धावेळी अमेरिकेच्या पायलटांनी त्यांच्या विमानांचे इथे जमीन सपाट असेल असे समजून आपत्कालीन लँडिंग केले होते. मात्र, त्यानंतर ते विमान आणि पायलटस् सगळेच रहस्यमयरीत्या गायब झाले होते. ते पुन्हा कधीही सापडले नाहीत. हे युद्ध संपल्यानंतर जपानी सैन्य या रस्त्याने तलावाकडून परत जात होते. ते देखील या तलावाजवळ येऊन रस्ता चुकले आणि गायब झाले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना मलेरिया झाला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, सत्य काय आहे हे आजपर्यंत समजले नाही. स्थानिक लोक या तलावाबाबत काही दंतकथाही सांगतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news