कडुनिंबामध्ये कॅन्सरविरुद्ध लढण्याची क्षमता | पुढारी

कडुनिंबामध्ये कॅन्सरविरुद्ध लढण्याची क्षमता

नवी दिल्ली : ‘कडुनिंब’ ही एक औषधीय वनस्पती म्हणून ओळखली जाते. या झाडासंदर्भात ‘बनारस हिंदू युनिव्हर्सिटी’ने एक नवे संशोधन केले आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार ‘कंपोनंट कॅन्सर’शी लढण्यास कडुनिंबाचे झाड उपयुक्‍त ठरू शकते.

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांच्या पथकाने हे महत्त्वपूर्ण संशोधक केले आहे. या युनिव्हर्सिटीचे प्रवक्‍ते राजेश सिंह यांच्या मते, या संशोधनाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्न्मेंटल टॉक्सिकोलॉजी’ नामक इंटरनॅशनल जर्नलमध्ये दोन भागांत प्रसिद्ध झाले आहेत. संशोधक विद्यार्थी कुमार गुप्‍ता, राजन कुमार तिवारी आणि शिव गोविंद रावत यांनी हे संशोधन केले आहे. यासाठी यूजीसी स्टार्ट अप रिसर्च ग्रँटने निधी पुरविला.

संशोधकांनी सांगितले की, कडुनिंब हे पारंपरिक औषधीय झाड आहे. या झाडाच्या पानांचा, फुलांचा औषधाप्रमाणे वापर होतो. अनेक आजारांवर या फुला-पानांचा औषध म्हणून वापर करण्यात येतो. कडुनिंबाच्या पानांत तसेच फुलांमध्ये एक वेगळे ‘बायोअ‍ॅक्टिव्ह’ घटक असते. त्याचे नाव ‘निंबोलवाईड’ असे आहे. त्याचा वापर कॅन्सरच्या काही प्रकारांवर उपचारासाठी करण्यात आला. त्यावेळी ते कंपोनंट या कॅन्सरच्या आजारांवर प्रभावी ठरल्याचे आढळून आले. या संशोधनातून भविष्यात कडुनिंबाच्या वापराने कॅन्सवरील उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button