खेकड्यांनी क्युबा मध्ये केला रस्त्यावर कब्जा | पुढारी

खेकड्यांनी क्युबा मध्ये केला रस्त्यावर कब्जा

न्यूयॉर्क : क्युबाच्या दक्षिण किनारपट्टीवर ‘मायग्रेटिंग क्रॅब्स’ची (खेकडे) संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामळे तेथील स्थानिक लोकांना या खेकड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. यापूर्वी हे खेकडे रस्त्यावर फारसे दिसत नव्हते, पण कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने रस्ते निर्मनुष्य झाल्याने ते रस्त्यावर आले.

  • ऑस्कर पुरस्कार 2022 : विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता तर जेसिका ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
    हजारोंच्या संख्येने हे खेकडे क्युबाच्या रस्त्यांवर खुलेआम फिरत आहेत. पावसाला सुरुवात झाल्याने लाल, पिवळे व काळ्या रंगाचे खेकडे लाखोंच्या संख्येने सर्वत्र फिरू लागले आहेत. सध्या या भागात खेकडे नसलेला रस्ताच सापडत नाहीत. काहीवेळा ते गाडी, पायाखाली चिरडले जातात. मात्र, अशा घटनांमुळे त्यांच्या संख्येवर कोणताच परिणाम होत नाही. क्युबाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या मतानुसार कोरोनानंतर खेकड्यांच्या संख्येचा जणू स्फोटच झाला आहे. वाढ सातत्याने सुरूच आहे. ती भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हे खेकडे गाडी, घर, घराच्या भिंती, समुद्र अशा अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत. ज्यावेळी हे खेकडे पसरतात, त्यावेळी त्या भागावर एखादी सतरंजी अंथरल्यासारखे वाटते. लोकांना सध्या चालणेही अवघड बनत आहे. खेकड्यांना नियंत्रित करण्याचे अनेक उपाय सध्या कुचकामी ठरत आहेत. काहीवेळा हे खेकडे गाडीखाली येतात. मात्र, त्यांच्या धारधार नांग्यामुळे गाडी पंचर होण्याचा धोका असतो, असे स्थानिकांचे मत आहे.

Back to top button