समाजात दुरावा निर्माण होईल असे चित्रपट नकोत : शरद पवार

समाजात दुरावा निर्माण होईल असे चित्रपट नकोत : शरद पवार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

देश एका विचाराने चाललेला आहे. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. समाजात पुन्हा दुरावा निर्माण होईल असे लिखाण किंवा चित्रपट टाळले पाहिजेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशीबोलताना ते म्हणाले की, या चित्रपटात कळत नकळत काँग्रेसवर दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं, तेच याला जबाबदार आहेत, असे ध्वनित केल जात आहे. या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. ज्या कालखंडात कश्मीरमध्ये जे काही घडल्याचे दाखवले जात आहे, त्या कालखंडात देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे नव्हते. त्यावेळी विश्वनाथ प्रतापसिंग यांच्याकडे नेतृत्व होते.

आज आवाज उठवणारे भाजपचे लोक त्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्या काळात देशाचे गृहमंत्री जे होते, तेही भाजपच्या पाठबळावरच होते आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. त्यावेळी असणारे राज्यपाल काँग्रेसच्या विचारांचे नव्हते. त्यामुळे आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news