London : इंग्लंडपेक्षा मोठ्या आकाराचे ग्लेशियर | पुढारी

London : इंग्लंडपेक्षा मोठ्या आकाराचे ग्लेशियर

लंडन : वैज्ञानिकांनी जगाला एक गंभीर इशारा दिला आहे. अंटार्क्टिकावर करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की तेथील इंग्लंडपेक्षाही मोठ्या आकाराचा ग्लेशियर सध्या तुटण्याच्या मार्गावर आहे. हा ग्लेशियर तुटून त्याचे तुकडे समुद्रात तरंगू लागले तर जगाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.सध्या अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण ध्रुवावर ‘ट्रॅफिक’ बरीच वाढली आहे. (London)

 जहाजांच्या वाढत्या येण्या-जाण्यामुळे प्राचीन सागरी इको-सिस्टीमला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज ऑफ द युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका’मध्ये देण्यात आली आहे. या संशोधनातून अन्यही अनेक धक्‍कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अंटार्क्टिकामध्ये जहाजांची वाहतूक वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.

London- समुद्रात मासेमारी, पर्यटनात वाढ

मासेमारी, पर्यटन, संशोधन आणि मालवाहतूक अशा अनेक कारणांमुळेही ये-जा वाढली आहे. या मानवी हस्तक्षेपाचा विपरित परिणाम अंटार्क्टिकावर पाहायला मिळत आहे. केम्बि—ज विद्यापीठाचे मुख्य संशोधक अर्ली मॅकार्थी यांनी म्हटले आहे की जर असेच घडत राहिले तर येथील जीवांना अन्यत्र निवारा शोधावा लागेल, जे कठीण आहे.

अंटार्क्टिका खंड आणि दक्षिण शेटलँड बेटसमूहांमध्ये अन्य स्थानांच्या तुलनेत जहाजांची वाहतूक सात पटीने वाढली आहे. त्यामुळे तेथील अतिशय मोठ्या आकाराचे ग्लेशियर तुटण्याचा धोकाही वाढला आहे. जर तसे घडले तर जगभर मोठीच आपत्ती येऊ शकते.

Back to top button