Kohli vs Gambhir : गंभीरसोबतच्‍या वादानंतर विराट कोहलीची ‘ती’ पोस्‍ट चर्चेत

Kohli vs Gambhir : गंभीरसोबतच्‍या वादानंतर विराट कोहलीची ‘ती’ पोस्‍ट चर्चेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2023 ) स्‍पर्धेत सोमवारी ( दि.१) लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) या संघांमध्‍ये झालेला सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. या सामन्‍यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर ( Kohli vs Gambhir ) यांच्‍यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी अमित मिश्रासह इतर खेळाडूंनी मध्‍यस्‍थी करत हा वाद थांवला होता. या प्रकारानंतर विराट कोहलीने आपल्‍या सोशल मीडिया हँडलवर एक  cryptic पोस्ट टाकली आहे. ही पोस्‍ट सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

सोमवारी सामना सुरु असताना लखनौचा खेळाडू नवीन-उल-हक याच्‍याबरोबर विराट काेहलीचा वाद झाला होता. सामना संपल्‍यानंतर विराट आणि गंभीर यांच्‍यात वाद झाला. याप्रकरणाची आयपीएल व्‍यवस्‍थापनाने गंभीर दखल घेतली. दोघांच्‍याही या सामन्‍यातील  मानधनावर १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक cryptic पोस्ट टाकली. यामध्‍ये त्‍याने माजी रोमन सम्राट मार्कस ऑरेलियसचे विधान वापरले आहे.

Kohli vs Gambhir : विराट काेहलीची 'ती' पोस्‍ट चर्चेत

विराट काेहलीने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की,"आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही."

अनिल कुंबळेंनी केले आवाहन

सोमवारी लखनौच्‍या मैदानावर घडलेल्‍या प्रकाराबाबत अनिल कुंबळे यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. दिग्गज क्रिकेटपटूं आणि खेळाडूंना एकमेकांबद्दल आदर राखवा, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. क्रिकेट खेळताना आपल्‍या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. तुम्हाला संभाषण करणे आवश्यक आहे; असे प्रकार अस्वीकार्य आहेत. काहीही असो, तुम्हाला विरोधकांचा आदर करावाच लागेल. तुम्ही खेळाचा आदर केला पाहिजे," असेही कुंबळे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news