

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयच्या वार्षिक करारातून विराट कोहलीला वर्षाला ७ कोटी पगार मिळतो; परंतु त्यापेक्षा जास्त विराट इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमावत असल्याची माहिती समोर आली. यानंतर विराटने त्याच्या सोशल मीडिया कमाईबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्याची कमाई इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी ११.४५ कोटी आहे हे "सत्य नाही" असे कोहलीने स्पष्ट केले आहे.
"आयुष्यात मला मिळालेल्या सर्व गोष्टींबद्दल मी कृतज्ञ आणि ऋणी आहे, परंतु माझ्या सोशल मीडिया कमाईबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या खर्या नाहीत," असे विराटने ट्विटरवर लिहिले आहे.
इंस्टाग्राम शेड्यूलिंग टूल हॉपर एचक्यूद्वारे संकलित केलेल्या यादीनुसार पोर्तुगालचा सुपरस्टार आणि पाच वेळा बॅलोन डी ओर विजेता रोनाल्डो प्रतिपोस्ट 3.234 दशलक्ष (अंदाजे रु. 26.76 कोटी) इतकी चकित करणारी रक्कम कमावतो. रोनाल्डोचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सी इंस्टाग्रामवरून प्रतिपोस्ट 2.597 दशलक्ष (अंदाजे 21.49 कोटी) कमाईसह दुसर्या स्थानावर आहे.
विराट कोहली हा ब्राझीलचा नेमार आणि फ्रान्सचा कायलिन एम्बाप्पे या फुटबॉल मास्टर्सच्या पुढे आहे. कोहली या यादीत १४ व्या स्थानावर आहे. विराट इन्स्टाग्रामवर प्रतिपोस्ट सुमारे १.३८४ दशलक्ष (अंदाजे ११.४५ कोटी रुपये) कमवतो. ही रक्कम त्याच्या स्वत:च्या आणि जसप्रीत बुमराहच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत सर्वांवर भारी पडला आहे आणि सलग तिसर्या वर्षी त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. जागतिक सुपरस्टार आणि फुटबॉल आयकॉन रोनाल्डोने सलग तिसर्या वर्षी इन्स्टाग्रामचा सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी म्हणून नाव पटकावले आहे. रोनाल्डो हा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला व्यक्ती आहे. 38 वर्षीय रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक 600 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणार्या अव्वल 20 सेलिब्रेटींमध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे.
हेही वाचा :