Virat Kohali 72 Century : विराटने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा फलंदाज | पुढारी

Virat Kohali 72 Century : विराटने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा फलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज आपल्‍या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. बांगलादेश विरुद्‍धच्‍या वनडे मालिकेती तिसर्‍या सामन्‍यात त्‍याने दमदार शतक झळकावले. ( Virat Kohali 72 Century) या कामगिरीमुळे त्‍याने ऑस्‍ट्रेलियाच्‍या रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला आहे.

विराटचे वनडेमधील ४४ वे शतक

भारत आणि बांगलादेश वनडे सामन्‍यात विराट कोहली याने सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाजीचे दर्शन घडवले. त्‍याने ८५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्‍या मदतीने शतक पूर्ण केले. विराटचे वनडेमधील ४४ वे तर कारकीर्दीतील ७२ वे शतक ठरले.

Virat Kohali 72 Century : रिकी पाँटिंगचा विक्रम काढला मोडित

विराटने आपल्‍या आजच्‍या शतकी खेळीने ऑस्‍ट्रेलियाच्‍या रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटिंग याने आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्‍ये ७१ शतके झळकावली होती. आजच्‍या शतकी खेळीमुळे विराट कोहली हा सर्वाधिक शतकी खेळी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. अग्रस्‍थानी सचिन तेंडुलकर असून, त्‍याने १०० शतके झळकावली आहे.

बांगलादेशमध्‍ये एक हजार धावा करणारा भारतीय फलंदाज

आजच्‍या सामन्‍यात विराटच्‍या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. बांगलादेशमध्‍ये एक हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.  अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी  श्रीलंकेच्‍या कुमार संगकारा यानेही बांगलादेशमध्‍ये एक हजार धावा पूर्ण केल्‍या होत्‍या.

 

 

Back to top button