विजय-अनन्याची लोकल वारी, ‘वाट लगा देंगे’ गाणे रिलीज

vijay deorkonda and ananya pandey
vijay deorkonda and ananya pandey
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा युवा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा चित्रपट 'लायगर' याचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेत रिलीज होणारा हा चित्रपट आणि यातले कलाकार हा सगळ्यांचा उत्सुकतेचा विषय ठरत आहे. आज सकाळी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी फिल्म प्रमोशनसाठी जाताना महागड्या गाड्या सोडून चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनचा पर्याय निवडला. खार स्टेशनवरून लोअर परेलपर्यंत या दोघांनी ट्रेनने प्रवास केला. तसेच या चित्रपटाचे दुसरे गाणे "वाट लगा देंगे"ही आज रिलीज करण्यात आले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर, अकडी पकडी आणि आता वाट लगा देंगे हे गाणे पाहता प्रत्येक गटातील प्रेक्षक तसेच सर्वसामान्यांनाही आकर्षित करेल, असे हे गाणे आहे.

  • विजय देवरकोंडा पुरी जगन्नाध निर्देशित लायगर या चित्रपटात माईक टायसन ह्या विशेष भूमिकेसोबत झळकणार आहे. हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news