‘केवळ आंघोळ, जेवण आणि…’ जाणून घ्‍या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ टॉपरचा थक्‍क करणारा दिनक्रम

‘केवळ आंघोळ, जेवण आणि…’ जाणून घ्‍या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ टॉपरचा थक्‍क करणारा दिनक्रम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठीची सर्वात आव्‍हानात्‍मक परीक्षा, असे 'जेईई ॲडव्हान्स्ड'चे वर्णन केले जाते. या वर्षी या परीक्षेत ३६० पैकी ३४१ गुण मिळवत वविलाला रेड्डी ( Vavilala Reddy )  हा देशात अव्‍वल ठरला आहे. मागील चार वर्ष केवळ 'अभ्‍यास' या एकच शब्‍दाचा ध्‍यास घेवून जगणार्‍या वविलाला याच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होतआहे. मात्र यासाठी त्‍याने घेतलेली मेहनत सर्वच विद्यार्थ्यांना प्रेरणा दे‍णारा ठरला आहे. जाणून घेवूया 'जेईई ॲडव्‍हान्‍स्‍ड' काळात वाविलालाच्या दिनक्रमाविषयी…

वाविलाला हा हैदराबादमधील श्री चैतन्य शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्‍याचे वडील राजेश्वर रेड्डी आणि आई नागलक्ष्मी हे दोघेही तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मडगुल येथील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. वविलाला याचा भाऊ श्रीचैतन्य हा BITS पिलानी येथे बीटेकच्या अंतिम वर्षात आहे.

चार वर्षांची अथक मेहनत

indianexpress.comसोबत बोलताना वविलाला याने सांगितले की, 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२३' परीक्षेत मी देशात पहिल्‍या पाचमध्‍ये येईन, असा आत्‍मविश्‍वास होता; प‍‍ण पहिला येईन, असे कधीच वाटले नव्‍हते. इयत्ता नववीत असतानाच मी देशातील सर्वोच्‍च शिक्षण संस्‍था 'आयआयटी'मध्‍ये शिक्षण घेण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले. इयत्ता नववीपासून मी 'जेईई'साठी समर्पितपणे तयारी केली. या परीक्षेसाठी मी दिवसरात्र खूप मेहनत घेतली. माझ्‍या शिक्षकांनी मला आत्मविश्वास आणि प्रेरणा दिली. आई-वडिलांचा पाठिंबा आणि शिक्षकांनी दिलेल्‍या अमूल्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाच्‍या बळावरच हे यश शक्‍य झाले, असेही तो विनम्रपणे सांगतो.

Vavilala Reddy : असा केला अभ्‍यास…

वविलाला सांगतो, मी आयआयटी जेईई ॲडव्हान्स्ड मुख्‍य परीक्षेच्‍या संबंधित असंख्य पुस्तकांचा संदर्भ घेत विस्तृत अभ्यास केला. अनियमित खाण्याच्या सवयींमुळे अधूनमधून ताप आणि पोटदुखी यासारख्या किरकोळ आरोग्याच्या समस्या जा‍णवल्या. मात्र आरोग्याच्या कोणत्याही महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागला नाही. दररोज सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मी अभ्‍यास करत असे. या काळात मी केवळ आंघोळ, जेवण आणि स्नॅक्स खाणे वगळता प्रत्येक क्षणाचा उपयोग अभ्‍यासासाठीच केला. गेली चार वर्ष मी केवळ अभ्‍यासात आणि परीक्षेच्‍या तयारीत स्‍वत:ला झोकुन दिले होते."

एकच लक्ष्‍य आयआयटी 'क्रॅक' करणे

आयआयटी क्रॅक करण्याचे माझे एकमेव लक्ष्‍य होते. मला अन्‍य कोणत्‍याही गोष्‍टीत स्वारस्य नव्हते, असे स्‍पष्‍ट करत आता आयआयटी बॉम्बेमधून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बीटेक करणार आहे. येत्या काही वर्षांत संगणक शास्त्रज्ञ किंवा सरकारसोबत काम करण्‍याचे माझे ध्‍येय असल्‍याचेही वविलाला याने म्‍हटले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news