Gigi Hadid : सुपरमॉडेल गिगी हदीदला उचललं, चुंबनही घेतलं (Video)

varun-Gigi Hadid
varun-Gigi Hadid
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका कार्यक्रमाच्या स्टेजवर सुपरमॉडेल गिगी हदीदला उचलून घेऊन तिचे चुंबन घेतल्याने बॉलिवूड अभिनेता वरूण धवन ट्रोल झाला. गालावर चुंबन घेतल्याने ट्रोल जालेल्या वरूनने आता स्पष्टीकरण दिलं आहे. वरुण म्हणाला की, आधीपासून गिगी (Gigi Hadid) स्टेजवर येण्याचे नियोजित होतं. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (एनएमएसीसी) च्या कार्यक्रमात वरुणच्या डान्स परफॉर्मन्सनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर वरुणला ऑनलाईन टिकेचा सामना करावा लागला. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, तो गीगीला हात धरून स्टेजवर आणतो आणि गोल फिरवतो. तो तिच्या गालावर चुंबनदेखील घेतला. (Gigi Hadid)

एका महिलेने ट्विटवर प्रतिक्रिया देत लिहिले होते- 'जर तुम्ही एक महिला आहे, तर तुम्ही कोणत्याही प्रकारे सुरक्षित नाही.' 'जर तुम्ही गिगी हदीद आहात तर जिला एका पार्टीत आमंत्रित करण्यात आलं आहे, तेथे वरुण धवनसारखे लोक तुम्हाला मस्तीच्या नावावर कसेही उचलणार आणि परवानगीविना तुम्हाला किस करणार.'

वरुण म्हणाला-मला वाटते की, तुम्ही जागृत झाला आहात. अशा परिस्थितीत मला हे सांगायचे आहे की, ती स्टेजवर येण्याआधी डान्सची प्लॅनिंग करण्यात आली होती. म्हमून एक ….नवीन ट्विटर कारण शोधा. गुड मॉर्निंग.

video-annesha twitter

सुपरमॉडल गिगी हदीद शुक्रवारी एनएमएसीसीच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाली होती. याशिवाय, अन्य दिग्गजांमध्ये टॉम हॉलंड, जेंडाया, पेनेलोप क्रूज, कार्ली क्लॉस, सलमान खान, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा-निक जोनस, करीना कपूर, सैफ अली खान सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news