

उत्तराखंड : पुढारी ऑनलाईन डेस्क – चमोली जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कालीमाटीजवळ गैरसैन-कर्णप्रयाग NH 109 महामार्गाचा चा काही भाग वाहून गेला. गैरसैन ते कर्णप्रयाग आणि नैनितालकडे जाणारे लोक रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडले आहेत.
शुक्रवार आणि शनिवारी उत्तराखंडातल सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सर्व जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याची सूचना दिलीय.