कोल्हापूर : शाळांमध्ये ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’चा जागर! | पुढारी

कोल्हापूर : शाळांमध्ये ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’चा जागर!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै.‘पुढारी’च्या वतीने 2024 मध्ये घेण्यात येणार्‍या ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन’ उपक्रमाचा जागर शाळांमध्ये सुरू झाला आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा नाव नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिक्षक व पालकांकडून उपक्रमाचे कौतुक होत आहे. शाळा-शाळांमध्ये उपक्रमाचा ‘फिव्हर’ पाहायला मिळत आहे.

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी. त्यांच्यामध्ये आवड निर्माण होऊन सक्षम भारत बनविण्यासाठी चांगले अधिकारी घडावेत, या हेतूने

दै.‘पुढारी’ने 3 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन’ उपक्रम हाती घेतला आहे. नुकताच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शैक्षणिक उपक्रमाचा शानदार प्रारंभ झाला आहे.

शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जाऊन उपक्रमाची माहिती दिली जात आहे. शाळांच्या दर्शनी भागात ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’चे डिजिटल, पोस्टर्स झळकत आहेत. शहरातील लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर, टेंबलाईवाडी विद्यामंदिर, नेहरूनगर विद्यामंदिर, ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, वाय. पी. पोवार विद्यालय, भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल, न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित रा. ना. सामाणी विद्यालय, विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेज, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू प्राथमिक विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उपक्रमांची माहिती देण्यात आली. इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूल, श्रीमती गंगाबाई गर्ल्स हायस्कूल, गोविंद हायस्कूल, आंतरभारती विद्यालय, कबनूर हायस्कूल, जवाहर हायस्कूल, कबनूर, आदर्श विद्यालय, कोतोली, नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर, यशवंत हायस्कूल कोडोली या शाळांमध्येही उपक्रमाचा प्रचार, प्रसार करण्यात आला.

राज्य व केंद्र पातळीवरील शिष्यवृत्ती, राष्ट्रीय पातळीवर नॅशनल प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर ही शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मराठी व सेमी, इंग्लिश माध्यमांतून घेतली जाणार आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे. पेपर 1- मराठी+गणितसाठी 75 प्रश्न व 150 गुण असतील. ही परीक्षा सकाळी 11 ते 12.30 या वेळेत होईल. पेपर 2- इंग्रजी + बुद्धिमत्ता यावर 75 प्रश्न व 150 गुण असणार आहेत. दुपारी 1.30 ते 3 या कालावधीत परीक्षा होईल. परीक्षा एकूण 300 गुणांची असणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सहभाग शुल्क 125 रुपये असणार आहे. जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये तिसर्‍या किंवा चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा निकाल फेब—ुवारीमध्ये जाहीर केला जाणार आहे.

कोल्हापूर शहर, जिल्ह्यासाठी संपर्क क्रमांक

(कोल्हापूर शहर) : 7620247676/8805007298. (कोल्हापूर जिल्हा) : कागल-राधानगरी-गगनबावडा : 7387465000, करवीर-भुदरगड : 8805020625,

गडहिंग्लज-आजरा-चंदगड : 7758087122, शाहूवाडी-पन्हाळा : 8805007117, हातकणंगले-शिरोळ : 9923128116, इचलकरंजी शहर : 8805021752.

Back to top button