US winter storm | अमेरिकेतील हिमवादळात ६० मृत्यू, कारमध्ये सापडले अनेक गोठलेले मृतदेह, धबधब्यांचा प्रवाह थांबला!

US winter storm | अमेरिकेतील हिमवादळात ६० मृत्यू, कारमध्ये सापडले अनेक गोठलेले मृतदेह, धबधब्यांचा प्रवाह थांबला!
Published on
Updated on

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत हिमवादळाशी (US winter storm) संबंधित घटनांतील मृतांचा आकडा ६० हून अधिक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिमवादळाने अमेरिकेतील विविध भागांतील आतापर्यंत ६२ लोकांचा बळी घेतला आहे. न्यूयॉर्क राज्यातील बफेलो शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बफेलो शहरात कार, घरे आणि स्नोबँक्समध्ये गोठलेल्या अवस्थेत मृतदेह आढ‍ळून आले आहेत. काही लोकांचा हिमवृष्टी दरम्यान मृत्यू झाला आहे, तर काहींचा मृत्यू हा आपत्कालीन मदत न मिळाल्याने झाला आहे.

बर्फ हटवण्याचे काम सुरु असून बर्फाखाली आणखी काही मृतदेह आढळण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. हिमवादळामुळे काही लोक कारमध्ये अनेक दिवस अडकून पडले होते. त्यांच्यापर्यंत वेळेत मदत न पोहोचल्याने काहींचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी पाणी गोठून धबधब्यांचा प्रवाह थांबला आहे.

दरम्यान, डेमोक्रॅटीक पक्षाचे पोलोनकार्झ यांनी या हिमवादळाला आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट वादळ असल्याचे म्हटले आहे. बफेलो शहरातील ४ हजारहून अधिक घरे आणि उद्योगांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

अमेरिकेतील अन्य राज्यांनाही हिमवादळाचा तडाखा बसला आहे. बफेलो शहराशिवाय अन्य ठिकाणी सुमारे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या ईशान्येकडील राज्य मेन पासून वॉशिंग्टनपर्यंत वीज पुरवठा ठप्प आहे. न्यूयॉर्कमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बफेलो शहरात मंगळवारी पोलिसांनी बर्फाच्छादित रस्त्यांवरून वाहतूक करण्यास बंदी घातली.

दरम्यान, पश्चिम न्यूयॉर्कमधील हे हिमवादळ किमान दोन पिढ्यांनंतरचे सर्वात प्राणघातक ठरले आहे. सरकारी अधिकारी आता जीवितहानीची माहिती गोळा करत आहे. बफेलोचे महापौर बायरन ब्राउन यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हिमवादळाशी संबंधित घटनांमध्ये शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर या प्रदेशात एकूण ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
कॅलिफोर्नियामध्येही जोरदार वारे, पाऊस आणि हिमवृष्टी झाली आहे. मध्य फ्लोरिडा भागातील तापमान उणे २.७ सेल्सिअस इतके कमी झाले. (US winter storm)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news