

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटर ऋषभ पंतवर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाल्यानंतर सर्वांनीच त्याच्यासाठी प्रार्थना केली. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाचाही समावेश होता. तिने Praying असा मेसेज लिहिला होता. पण, उर्वशीने कॅप्शनमध्ये कुठेही ऋषभ पंतचे नाव घेतले नव्हते. शिवाय तिने एक स्वत:चा फोटो अपलोड केल्याने तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागेल होते. आता ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी विमानतळावर कॅमेराबद्ध झालीय. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की, ती ऋषभला भेटण्यासाठी जात असावी. (Rishabh Pant)
ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आलीय. त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी न्यायचं की नाही, याचा निर्णय अजून झाला नाही, ही माहिती ऋषभच्या कुटुंबियांकडून मिळालीय.
दरम्यान, अभिनेते अनिल कपूर, अनुपम खेर आणि दिल्ली टीममधील खेळाडू नितीश राणा, दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक श्याम शर्मा यांनी रुग्णालयात जाऊन ऋषभची भेट घेतली होती. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.
या दरम्यान आता उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ समोर आलाय. उर्वशी मुंबई विमानतळावर कॅमेराबद्ध झालीय. ३१ डिसेंबर रोजी ती विमानतळावर दिसली. यावेळी तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऋषभच्या फॅन्सनी तिला थेट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारले आहे. एका युजरने विचारलं की, "तू ऋषभ पंतला भेटायला जात आहेस का?" तर दुसऱ्या युजरने लिहिलं- "उर्वशी देहराडूनला जातेय वाटतं."