

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आहे. क्रिकेटर ऋषभ पंत आज ४ ऑक्टोबर रोजी आपला २५ वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. उर्वशी-ऋषभ पंतचा कोल्ड वॉर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या वादांदरम्यान, उर्वशीने ऋषभला छोटू भैयादेखील म्हणून बोलावलं. आता आता ऋषभ पंतच्या जन्मदिनी जो व्हिडिओ उर्वशी रौतेलाने शेअर केला आहे, ते पाहून असं वाटत आहे की, क्रिकेटर तिच्यासोबत झालेले सर्व वाद पाठीवर टाकेल. या व्हिडिओमध्ये उर्वशी फ्लाईंग किस देताना दिसतेय. तर दुसरी ईशा नेगीची पोस्टदेखील चर्चेत आहे. तिने ऋषभला माय लव्ह म्हटले आहे. (Urvashi Rautela)
या व्हिडिओत उर्वशी रेड गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. कॅमेऱ्यात उर्वशीच्या खूप साऱ्या सुंदर अदा कॅप्चर झाल्या आहेत. बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक वाजत आहे. मजेशीर ही गोष्ट आहे की, उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये हॅप्पी बर्थडेदेखील लिहिलं आहे.
उर्वशीच्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत. ऋषभ पंत का बर्थडे है, ऋषभ पंत समझ रहे हो न? तर आणखी एकाने सांगितले की- अरे बिनोद, आज आरपी भैयाचा वाढदिवस आहे…. समजलं काय?
उर्वशी म्हटलं होतं- मला केवळ हेच म्हणायचं आहे की, सॉरी, आय एम सॉरी
उर्वशी रौतेलाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विचारण्यात आले की, तिला आरपीला कोणता मेसेज द्यायचा आहे का, यावर तिने लिहिलं, 'साधी गोष्ट एकदम बकवास.' यावर तिला विचारण्यात आले की, तुम्हाला ऋषभ पंतला काय म्हणायचं आहे का, याच्या उत्तरादाखल उर्वशी रौतेलाने म्हटलं- मी केवळ हे म्हणेन की सॉरी, आय एम सॉरी. तिने हात देखील जोडले.
ऋषभ पंतने ईशासोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यानंतर ईशा नेगीला ऋषभ पंतचे फॅन्स भाभी म्हणू लागले. दिल्लीमध्ये आयोजित आयपीएल दरम्यान ईशा ऋषभची बहिण साक्षीसोबत स्टेडियममध्ये दिसली होती. त्यानंतर तिची चर्चा होऊ लागली. २०१९ मध्ये वर्ल्ड कपच्या आधी जानेवारीमध्ये ऋषभ पंतने ईशासोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, त्यामध्ये दोघांची बॉन्डिंग स्पष्ट दिसत होती. ऋषभने लिहिलं होतं-मी आनंदी असण्याचं कारण तू आहेस, आणि मला केवळ तुला आनंदी ठेवायचं आहे.