

पुढारी ऑनलाईन; उर्फी जावेद (Urfi Javed photo) आपल्या हटके फॅशन आणि बोल्ड फोटोनी नेहमीच चर्चेत असते. तर सध्या ती आपल्या बोल्ड फोटोंनी नव्हे तर तिला झालेल्या दुखापतीने चर्चेत आली आहे.
बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेदने (Urfi Javed photo) आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील उर्फीला पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. नेहमी सोशल मीडियावर हटके फॅशन आणि बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घालणाऱ्या उर्फीच्या पाठीवर लाल- काळ्या रंगाचे ठिपके दिसून येत आहेत. यावरून तिच्या पाठीवर दुखापत झाल्याचा चर्चा होत आहे. हे ठिपके हुबेहुब लव्ह बाईटसारखे दिसत आहेत.
हा व्हिडिओ शेअर होताच तिच्या चाहत्यांना उर्फीला ह्य जखमा कशाने झाल्या आहेत? हा प्रश्न पडला आहे. याच दरम्यान उर्फीने झालेल्या जखमाचा खुलासा स्वत: केला आहे. यात तिने सांगितले की, हे लव्ह बाईटस मला एका खुर्चीने दिले आहेत. मी एका खुर्चीवर बसले असताना मला लाल रंगाच्या पाठीवर वळ उमटले असल्याचे तिने सांगितले आहे.
यामुळे उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने 'तुम्ही विश्वास ठेवू शकता की एका खुर्चीने हा लव्ह बाईट दिला आहे.' अशी हटके कॅप्शन लिहिली आहे. यच दरम्यान चाहते अनेक वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत.
या सगळ्यावरून चाहत्यांनी उर्फीच्या पाठीला जखमा झाल्या असून ती लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहेत. तर काही चाहत्यांना तिच्या दुखापतीवर चिंता व्यक्त करत, दुखापत जास्त आहे का?, कधी बरी होणार?, वेळ लागेल का?. असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
याआधी उर्फीने साडीतील फोटो आणि लाल रंगाच्या ड्रेसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या साडीतील फोटोवर चाहत्यांनी तिला हटके कॉमेंन्टस देत ट्रोल केलं होतं. ती नेहमी आपले हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. उर्फीचे सोशल मीडियावर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हेही वाचलंत का?