

पुढारी ऑनलाईन – अमेरिकेच्या व्हिसासाठी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने Visitor व्हिसासाठीचा प्रतीक्षा कालावधी ८०० दिवस इतका वाढलेला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी किमान ४०० दिवस इतका वाढलेला आहे. व्हिसासाठीच्या मुलाखतीचे स्लॉट अमेरिकेच्या दिल्लीतील दूतावास आणि भारतातील इतर शहरांतील वाणिज्य दूतावासांनी जाहीर केले आहेत, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. (united states visa appointment slots)
"सर्व प्रकारच्या व्हिसासाठी मुलाखती आता सुरू होत आहेत. पण व्हिसासाठी फार मोठ्या संख्येने अर्ज आल्याने प्रतीक्षा कालावधी फार जास्त आहे," असे ट्वीट अमेरिकेच्या भारतीय दूतावासाने केले आहे. "ज्यांनी व्हिसासाठीची फी भरली आहे, त्यांना अजूनही मुलाखतीसाठी वेळ मिळालेली नाही, याची जाणीव आम्हाला आहे. सर्वसाधारण प्रकारातील जे व्हिसा अर्ज आहेत, ते तातडीने निर्गमित व्हावेत, यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे," असे दूतावासाने म्हटले आहे.
सध्या व्हिसासाठी जी प्रक्रिया फी भरली आहे, त्याची वैधता वाढवून ३० सप्टेंबर २०२३ अशी करण्यात आली आहे. B1 आणि B2 प्रकारातील व्हिसासाठीही प्रक्रिया या महिन्यात सुरू केली आहे. तसेच काही प्रकारच्या व्हिसासाठी मुलाखती न घेण्याची मुभा डिसेंबर २०२२पर्यंत देण्यात आली आहे.
हेही वाचा