file photo
Uncategorized
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास पोलिस कोठडी
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत, तिच्यावर सुमारे दोन महिने अत्याचार करणार्या तरुणाला पाचोड पोलिसांनी सोमवारी (दि. 27) रात्री बेड्या ठोकल्या. त्याची 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
सदर आरोपीला 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न् यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले. आकाश ऊर्फ अक्षय हिरामण पवार (20, रा. भटाणा, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
हेही वाचलंत का?

