पुणे : पलायन केेलेला आरोपी अद्याप फरार | पुढारी

पुणे : पलायन केेलेला आरोपी अद्याप फरार

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर पोलिस स्टेशनच्या कोठडीतून दि. 22 रोजी कौले उचकटून आरोपीने पलायन केले होते. मात्र, अद्यापही तो न सापडल्याने पोलिस दलात चिंतेचे वातावरण आहे.

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

शिरूरच्या पोलिस कोठडीत शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी रेवण बट्टीबिरू सोनटक्के (रा. वारजे माळवाडी, पुणे) हा अटकेत होता. अटकेत असताना रेवणने पोलिस कोठडीमधील बंद खोलीची कौले उचकटून पहाटे पलायन केले. कोठडी असलेली इमारत इंग्रजांच्या काळातील असून, तिची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे.

Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, या पोलिस कोठडीत चार खोल्या आहेत. इमारत अतिशय जुनी झालेली आहे. इमारतीस पाठीमागील बाजूस संरक्षक भिंत नाही व वरील बाजू कौलारू असून, ते मोडकळीस आले आहे. इमारतीची डागडुजी करण्यासाठी शिरूर स्टेशनने बांधकाम विभाग यांना पत्र दिले होते. या कोठडीतून आरोपीने पलायन केल्यानंतर पुन्हा या कोठडीची चर्चा रंगू लागली आहे.

Back to top button