नागपूर : बलात्काराच्या गुन्हात DNA चाचणी सबळ शास्त्रीय पुरावा; दोषीची जन्मठेप कायम

नागपूर : बलात्काराच्या गुन्हात DNA चाचणी सबळ शास्त्रीय पुरावा; दोषीची जन्मठेप कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आणि नंतर तिला हॉस्पिटलमध्ये टाकून पळून जाणाऱ्या दोषीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने DNA चाचणीचा निष्कर्ष शास्त्रीय पुरावा म्हणून ग्राह्य मानला आहे. याशिवाय पीडित मुलीची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. (Rape cases DNA test)

हरीशचंद्र सीताराम खारोनकर (वय ५५) विरुद्ध राज्य सरकार या खटल्यात न्यायूर्तींनी DNA रिपोर्टच्या माध्यमातून उपलब्ध झालेला शास्त्रीय पुरावा याचिकाकर्त्यांवरील दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे, असे म्हटले आहे. (Rape cases DNA test)

न्यायमूर्ती रोहित देव, उर्मिला जोशी-फाळके म्हणाल्या, "DNA चाचणी ज्या प्रकारे चुकीचे दोषारोप उघड करते, त्याच प्रकारे गुन्हाही सिद्ध करू शकते. या माध्यमातून तपास आणि फौजदारी न्यायपद्धती यात मोठी सुधारणा होऊ शकते."

यातील दोषीचे म्हणणे असे होती की त्याने पीडितेला आधार दिला होता, काळजी घेतली आणि चांगल्या शाळेत दाखल केले. पीडित मुलीच्या वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरे लग्न केले होते. न्यायालयाने दोषीचे म्हणणे फेटाळून लावले.

"या प्रकरणात पीडितेचा विश्वासघात झाला आहे. या दोषीवर मुलीचे रक्षण करण्याची जबाबदारी होती," असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली होती. दोषीने मुलीवर वारंवार बलात्कार केला, त्यातून मुलगी गरोदर राहिली असे तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या आईने पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केले होते आणि पीडित मुलीला दोषीच्या घरी सांभाळ करण्यासाठी ठेवले होते. पीडित मुलगी ९वीत शिकत असताना तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला होता. ही मुलगी गरोदर राहिली. पोटात दुखीची तक्रार केल्यानंतर मुलगी ७ महिन्याची गरोदर आहे, हे लक्षात आले. या मुलीला बाळंत वेदना सुरू झाल्यानंतर दोषीनेच तिला दवाखान्यात दाखल करून पळ काढला होता. सत्र न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या विरोधात त्याने खंडपीठात याचिका दाखल केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news