Jalgaon Water Shortage | 100 टँकर, 157 विहिरींचे अधिग्रहण; जिल्ह्यात पाण्याची टंचाई!

Jalgaon Water Shortage | 100 टँकर, 157 विहिरींचे अधिग्रहण; जिल्ह्यात पाण्याची टंचाई!
Published on
Updated on

[author title="जळगाव, नरेंद्र पाटील" image="http://"][/author]

जिल्ह्यात एकीकडे उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे. याकरता टँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील 82 गावांना 101 टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 137 गावांमधील 157 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

जळगाव जिल्हा हा तापमानासाठी ओळखला जातो. सध्या जळगाव जिल्ह्याचे तापमान 44 ते 45 अंशावर येऊन ठेपले आहे. दुपारी उन्हाच्या लाटा सुरू आहे. असे असताना पंधरा तालुक्यांमधील ८२ गावांमध्ये 101 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 137 गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 157 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, चोपडा या तालुक्यांमध्ये एकही टँकर अद्याप सुरू झालेले नाही. मात्र यावल तालुका सोडल्यास जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये विहिरींचे अधिकरण झालेले आहेत.

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा चाळीसगाव तालुका व अमळनेर तालुक्यात होत आहे. अमळनेर तालुक्यामध्ये 27 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून 31 गावांमध्ये 37 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ते अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील यांचा विधानसभा क्षेत्र आहे. तर चाळीसगाव हे नामदार गिरीश महाजन यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते व आमदार मंगेश चव्हाण यांचा तालुका आहे. त्या ठिकाणी 46 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर 38 गावांमध्ये 47 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. राज्याचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या तालुक्यातील नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून 14 गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

सन 2023 -24 पाणी टंचाई निवारणार्थ आजरोजी सुरु असलेल्या उपाययोजनांचा संक्षिप्त गोषवारा

टॅंकरग्रस्त गावांची नावे

1. चाळीसगांव-, 1 विसापूर तांडा, 2. अंधारी, 3. करजगाव, 4. कृष्णा नगर, 5. हातगाव, 6. हिरापूर, 7. तामगव्हाण, 8. रोहिणी, 9. राजदेहरे, 10. ब्राह्मणशेवगे, 11. घोडेगाव, 12. हातगाव भिल्लावस्ती, 13 पिंप्री बु.प.दे 14. खराडी, 15. डोणदीगर, 16. तळेगाव, 17. न्हावे, 18. ढोमणे, 19. पिंपळगाव, 20. माळशेवगे, 21. शिंदी, 22. चत्रभुज तांडा. 23. शेवरी 24. बिलाखेड 25. शिरसगाव 26. जुनपाणी, 27. पिंपळवाड निकुंभ, 28. तळोदे प्र दे . 29. चिंचगव्हाण 30. अभोणे तांडा, 31. सुंदरनगर, 32. नाईकनगर तांडा क्र. 1. 33. वाघळ (लक्ष्मी आणि इंदिरा नगर)

2. भडगाव -1 तालबंद तांडा, 2. वसंतवाडी, 3. आंचलगाव, 4. मालगाव, 5. वडगाव बु. वस्ती, 6. धोत्रे

3. अमळनेर -1. तळवाडे, 2.शिरसाळे बु., 3. निसडी, 4. लोणपंचम, 5. नागाव खु. 6. देवगाव देवळी, 7. सबगव्हाण, 8. भरवस, 9. अंचलवाडी, 10. आटाळे, 11. पिंपळे खु. चिमणपुरी,
12. डांगर बु., 13 नागाव बु., 14. आडी अनोरे, 15. गलवाडे बु., 16. लोणचारम तांडा, 17. पिंपळे बु. 18. चोपडाई, 19. कावपिंप्री, 20. कोंढावळ

4. पारोळा -1. खडीढोक, 2. हनुमंतखंडे, 3. कण्हेर, 4. चाहुत्रे/वडगाव प्र अ, 5. मंगरूळ

5. भुसावळ -1. कंडारी

6. जामनेर — 1. रोटवड, 2. मोरगाव, 3. काळखेडे, 4. एकुलती बु. 5. एकुलती खु. 6. वाडी, 7. ओझर बु., 8. ओझर खु., 9. हिंगणे न.के., 10. वाकोद, 11. जांभोळ, 12. किन्ही

7. जळगाव– 1. वराड, 2. लोणवाडी बु., 3. सुभाषवाडी, 4 शिरसोली 5. कुसुंबे खु.

एकुण 82 गावे. 101 टॅंकर

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news