

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या फेसबुक मित्राशी लग्न करण्यासाठी सीमा ओलांडलेल्या अंजुचा व्हिसा पाकिस्तानने वाढवला आहे. अंजू इस्लाम स्वीकारल्यानंतर तिला फातिमा नावाने ओळखली जाते. तिने २५ जुलै रोजी तिचा २९ वर्षीय मित्र नसरुल्लाहशी विवाहही केला आहे. तो अप्पर दीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. (Anju Nasrullah Love Story)
राजस्थानमधील भिवडी जिल्ह्यातील अंजू आपली पती अरविंद आणि मुलांसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती.अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. तिला १५ वर्षांची एक मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे. तिची पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तरुण नसरुल्ला याच्याशी फेसबुकवर २०१९ मध्ये मैत्री झाली. काही दिवसांमध्ये या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती पाकीस्तानमध्ये गेली.
मागील काही दिवस पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची लव्हस्टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. नेपाळमार्गे भारतात आल्याचा दावा ती करत आहे. सीमा हैदर प्रमाणेच भारतीय महिला अंजू आपल्या फेसबूकवर फ्रेन्डसाठी पाकिस्तानला गेली हाेती. ती पर्यटन व्हिसाच्या माध्यमातून पाकिस्तानला गेली हाेती. मित्र नसरुल्लाहशी विवाहही केल्यानंतर पाकिस्तानने आता तिच्या व्हिसा मुदतीत वाढ केली आहे.
अंजुचा व्हिसा पाकिस्तानने एक वर्षाने वाढवला आहे, असे तिचा पाकिस्तानी पती नसरुल्ला यांनी मंगळवारी (दि.८) सांगितले. नसरुल्ला यांनी सांगितले की, अंजूचा व्हिसा, जो आधी २ महिन्यांसाठी वाढविला गेला होता तो आता त्यांच्या लग्नानंतर एक वर्षासाठी वाढविण्यात आला आहे. तिचा मूळ व्हिसाची मुदत २० ऑगस्ट रोजी संपणार होती. मंत्रालयाला संबंधित कागदपत्रांची तरतूद केल्यानंतर माझी पत्नी अंजूचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. यासाठी सर्व पाकिस्तानी संस्था आम्हाला सहकार्य करत आहेत, असेही नसरुल्ला म्हणाले.
हेही वाचा :