व्‍हिडीओ : ती आई होती म्‍हणून….हत्तीण पिल्‍लाचा मृतदेह सोंडीत पकडून चहाच्या मळ्यात सैरभैर धावत राहिली !

A mother elephant seen carrying carcass of her dead calf
A mother elephant seen carrying carcass of her dead calf
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  एका आई आणि तिच्या मृत पिल्लाचा हृदयद्रावक  व्‍हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी अंबारी टी इस्टेटमध्ये एक हत्तीण तिच्या मृत पिल्ल्याचा मृतदेह ओढून नेताना दिसत आहे. असा साधारण सात किलोमीटर प्रवास तिने केला. त्या पिल्लाचा मृतदेह बघण्यासाठी बिन्नागुरी वन्यजीव रक्षकांची टीम तेथे पोहोचली पण, ही हत्तीण मात्र टी-इस्टेटमधून पिल्लाला  घेऊन तिथून निघून गेली. या पिल्लाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या हत्तीणीने आपल्या पिल्लाला सोंडेत पकडले. ती आपल्या कळपासह एका चहाच्या बागेतून दुसऱ्या चहाच्या मळ्यातून घेऊन गेली. या कळपात ३० ते ३५ हत्ती असल्याचे वन अधिकारी सांगत होते. ही हत्तीण आपल्या या काळजाच्या तुकड्याला सोंडेत घेऊन, कोणीतरी वाचवेल, या वेड्या आशेने  चहाच्या मळ्यात सैरभैर धावताना व्हीडिओमध्ये दिसत आहे. हे दृश्य पाहताना प्रत्येकाच्या काळजाचा ठोकाच चुकतो.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हत्तीणीने या पिल्लाला आपल्या सोंडेत घेऊन एका मळ्यातून दुसऱ्या बागेत असा साधारण ७ किमीचा प्रवास केला असावा. वन कर्मचारी या परिसरात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news