Sakri Lok Sabha Elections | साक्री तालुक्यात 5 ते 7 मे दरम्यान मद्यविक्रीस बंदी, हे आहे कारण | पुढारी

Sakri Lok Sabha Elections | साक्री तालुक्यात 5 ते 7 मे दरम्यान मद्यविक्रीस बंदी, हे आहे कारण

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित झाला असून 16 मार्च, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील वलसाड व बारडोली लोकसभा मतदार संघात मंगळवार, 7 मे 2024 रोजी मतदान होणार असल्यामुळे संपुर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा गुजरात राज्याचे सीमेला लागुन आहे. तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्च विषयक बाबीच्या अनुषंगाने संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने गुजरात राज्याचे सीमेला लागुन असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपुर्वीच्या 48 तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवणे आवश्यक आहेत.

असे असेल अनुज्ञप्ती बंदचे क्षेत्र

धुळे जिल्ह्यातील संपुर्ण साक्री तालुक्यात रविवार, 5 मे 2024 रोजी सांयकाळी 6.00 वाजेपासून पुढे, सोमवार, 6 मे 2024 रोजी पुर्ण दिवस तसेच मंगळवार, 7 मे 2024 रोजी सांयकाळी 6.00 वाजेपर्यंत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. तरी या कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारकांनी या दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा –

Back to top button