नंदुरबार : जप्त केलेला वाळूचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच चोरीला गेला

क्राईम
क्राईम

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन कसा झटका देतात याचे अनेक रंजक किस्से घडलेले आहेत. तसलाच किस्सा नंदुरबार येथेही घडला. 31 टन रेतीसह जप्त करण्यात आलेला ट्रक चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातूनच पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरीस गेलेला ट्रक 12 लाख रुपये किंमतीचा तर त्यातील रेती 18 हजार 600 रुपयांची असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी नंदुरबार येथील तलाठी यांनी पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, 12 लाख रुपये  किंमतीचा व ३१ टन वजनाची रेती भरलेला अशोक लेलन कंपनीचा ट्रक क्र. MH- २१ BH- १०२६ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून पसार झाला आहे. संशयित ट्रक मालक पशु गुलजार शेख आणि दुसरा ट्रक चालक विनोद विठ्ठल वर्दे (रा. टाकळी खुलताबाद जि. औरंगाबाद) यांनी ट्रक चोरुन नेला असावा, अशी फिर्याद जयेश सुभाषसिंग राऊत (तलाठी, नंदुरबार) यांनी दिली आहे. संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news