Thailand : थायलंडमध्ये फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात २३ जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

Thailand : थायलंडमध्ये फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात २३ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य थायलंडमधील मध्य सुफान बुरी प्रांतातील साला खाओ टाउनशिपजवळ फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी (दि.१७) झालेल्या स्फोटात २३ लोकांचा मृत्यू झाला.  दुपारी ३ वाजता हा स्फोट झाला. याबाबत सुफान बुरी प्रांताचे गव्हर्नर नट्टापत सुवानप्रतीप यांनी माध्यमांना माहिती दिली. स्थानिक बचाव सेवेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये जमिनीवर पडलेला धातूचा ढिगारा आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट दिसून येत आहेत. (Thailand)

Thailand : २३ जणांचा होरपळून मृत्यू

माहितीनुसार थायलंडमधील मध्य सुफान बुरी प्रांतातील साला खाओ टाउनशिपजवळ बुधवारी (दि.१७) दुपारी ३ च्या सुमारास फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. याबाबत सुफान बुरी प्रांताचे गव्हर्नर नट्टापत सुवानप्रतीप माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, “स्फोटात तेवीस लोकांचा मृत्यू झाला असुन, स्फोट कशामुळे झाला असावा, याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. कारखाना वैध परवान्यासह कायदेशीररित्या चालत होता. तर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आजूबाजूच्या परिसराचे कोणतेही नुकसान झाले नाही. स्फोटामुळे एका घराच्या काचेच्या खिडक्यांचे थोडे नुकसान झाले आहे. पोलीस लेफ्टनंट जनरल नैयावत फडेमचीद यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की पंतप्रधान श्रेथा थाविसिन सध्या जागतिक आर्थिक मंचासाठी स्वित्झर्लंडमध्ये आहेत. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button