Dhangar reservation : जत तहसील कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण

Dhangar reservation : जत तहसील कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण
Published on
Updated on

जत: पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून अंमलबावणी करावी, राजे यशवंतराव होळकर घरकुल योजना व अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित वितरण करावे, घोषणा केलेल्या निधीची तरतूद करावी, समाज्याच्या प्रश्नावर आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावीत, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बिरू खर्जे कुटुंबीयांना २५ लाख तत्काळ मदत द्यावी, या मागण्यासाठी जत तहसील कार्यालयासमोर अशोक गोरड यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. Dhangar reservation

या उपोषणाला दुसऱ्या दिवशी जत तालुका ओबीसी समाज बांधवांनी तसेच तुकाराम महाराज आणि धनगर समाजाच्या बांधवानी उपस्थित राहत पाठिंबा दिला. Dhangar reservation

Dhangar reservation  आंदोलनस्थळी अभ्यास समितीची होळी

आंदोलनस्थळी दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षणावरून राज्य शासनाने समिती नेमून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. याच्या निषेधार्थ आंदोलनस्थळी समितीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.

यावेळी युवा नेते विक्रम ढोणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पाटील, लोकमाता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव वगरे, मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळी, तुकाराम माळी, सलीम गंवडी, रमेश माळी, दिनकर पतंगे, प्रवीण शेठ गडदे, अन्नप्पा कंदे, तयाप्पा वाघमोडे, पापा हुजरे, रमेश माळी, सागर शिनगारे, तेजस्विनी व्हनमाने, युवराज माने, योगेश एडके, राजू लोखंडे, आमसिध शेंडगे, बाळू पांढरे, भीमराव खरात, शरद सरगर, विठ्ठल पुजारी, पिंटू माने, संतोष सलगरे, कृष्णा गुरव, विकास लेंगरे आदी जत तालुका ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news