

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. १६ टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. असा निर्णय बिहारमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारने प्रामाणिक इच्छा दाखवून कायद्याला धरून आरक्षण द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही कारण जिल्ह्यातील 80 टक्के जिनिंग प्रेसिंग बंद आहे सूतगिरणी बंद आहे कापसाचे मोठे संकट समोर उभे आहेत कापसाला भाव मिळत नाहीये गेल्यावर्षी 12000 ने भावाला सुरुवात झाली होती तो 7000 आला होता सरकारकडून यामध्ये हस्तक्षेप होत नाही. सरकारने यामध्ये 12000 भाव देण्यासंदर्भात किमान 5000 प्रति हेक्टर अनुदान दिले पाहिजे. सीसीआयच्या माध्यमातून 12000 रुपये कापसाची खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे.
राज्याचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी दहा वर्षांपूर्वी कापसासाठी आंदोलन करून सात हजार रुपये भाव मागितला होता आता दहा वर्षानंतरही कापसाला सात हजार रुपये भाव देत आहे. ही शेतकऱ्यांची टिंगलटवाळी आहे. याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असे खडसे म्हणाले. संजय राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या फोटो खाली कोणाचे नाव घेतलेले नाही. त्यांच्याकडे असलेले व्हिडिओ व फोटो त्यांनी जनतेसमोर आणावेत. म्हणजे खरे खोटे काय आहे ते जनतेसमोर येईल.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना हार्ट अॅटक आला होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आज जळगाव येथे रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर खडसे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
हेही वाचा