Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हार्ट अटॅक; उपचारासाठी मुंबईला हलविले | पुढारी

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हार्ट अटॅक; उपचारासाठी मुंबईला हलविले

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर जळगावमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारांसाठी एकनाथ खडसे यांना. एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईत हलविण्यात आले आहे. एअर अ‍ॅम्बुलन्सची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची व्यवस्था केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं. आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जळगावातील गजानन हार्टकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळते. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईत रवाना झालाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी खडसे यांच्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव येथे एकनाथराव खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉ. विवेक चौधरी यांनी ‘माध्यमांसोबत बोलतांना सांगितले की, खडसे यांना दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. छातीत दुखणे आणि खोकला सुरू होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मधुमेह आणि इतर जुने आजार आहेत. सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

Back to top button