Nepal Earthquake : भारत नेपाळच्या पाठीशी आहे, सर्वतोपरी मदत करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

Nepal Earthquake : भारत नेपाळच्या पाठीशी आहे, सर्वतोपरी मदत करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळ पुन्हा एकदा शक्‍तीशाली भूकंपाने हादरले आहे. नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. शुक्रवारी (दि.३) रात्री उशिरा झालेल्‍या या भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत १२८ जणांचा मृत्‍यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,”जीवितहानी आणि हानीबद्द दुःख. भारत नेपाळच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे.”(Nepal Earthquake)

Nepal Earthquake : भारत मदत करण्यास तत्पर

नेपाळमध्ये शुक्रवारी (दि.३) उशिरा झालेल्या ६.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. तर अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबल्‍याने गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या भूकंपाचे धक्‍के देशातील इतर राज्‍यातही बसले आहेत. यामध्ये दिल्‍ली, उत्‍तर प्रदेश, बिहार, उत्‍तराखंडमध्येही भूकंपाचे धक्‍के बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,”नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि हानीबद्दल मनःपूर्वक दुःख. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.

हेही वाचा 

Back to top button