महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही; दानवेंचा दावा

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही; दानवेंचा दावा

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : देशात तिसर्‍या आघाडीचा व राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग कदापिही यशस्वी होणार नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवितानाच तिसरी आघाडी विसर्जित होईल, अशी टिका रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असताना रावसाहेब दानवे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. राणाजगजजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अनिल काळे आदी उपस्थित होते. रावसाहेब दानवे यांचे रेल्वेने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी रेल्वेस्टेशन परिसराची पाहणी केली.

मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, की आमच्याकडे २०२४ साठी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी आहेत. पूर्वी काँग्रेसकडे इंदिरा गांधींचा चेहरा होता. आता सत्तेसाठी एक होत असलेल्या तिसर्‍या आघाडीकडे पंतप्रधानाचा उमेदवार कोण? हे त्यांनी जाहीर करावे. हे ठरविण्याठी या आघाडीने बैठक घेतली तर ती आघाडी तिथेच विसर्जित होईल. पाटण्यात झालेली सर्व विरोधी पक्षांची बैठक राहुल गांधींच्या लग्‍नाबाबत चर्चा करण्यासाठी झाली होती का?, असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महाराष्ट्रातील सत्ताकारणाबाबत ते म्हणाले, की राज्यात ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. कोणत्या पक्षाला कोणती जागा यावर पार्लमेंटरी कमिटीत निर्णय होईल. शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारही असे ते सांगितले. ठाकरेंची शिवसेना १९ जागा मागत असल्याने जागावाटपाचा तिढा हा महाविकास आघाडीतील मोठा अडथळा असेल. त्यामुळे ही आघाडी टिकणार नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news