हाऊसिंग सोसायट्यांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी | पुढारी

हाऊसिंग सोसायट्यांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. ते अधिकारी सोसायट्यांचे प्रश्न व समस्या तातडीने सोडविणार आहेत, असा दावा आयुक्त शेखर सिंह यांनी केला आहे. हाऊसिंग सोसायट्यांच्या पदाधिकारी विविध समस्या व तक्रारी घेऊन थेट आयुक्तांशी चर्चा करतात. त्या विषयावर बैठका घेतल्या जातात. पालिकेकडून समस्या सोडविल्या जात नसल्याने निवडणुकावर बहिष्कार घालण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत.

सोसायटीधारकांच्या प्रश्नांसाठी तातडीने नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी घेतला आहे. नोडल अधिकारी म्हणून भूमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक आणि सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये पालिकेमार्फत विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सोसायट्यांच्या कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कर संकलन, विद्युत व रस्त्यांची विविध कामे हे अधिकारी करणार आहेत. त्याबाबत अधिकार्यांनी कृती आराखडा तयार करून आयुक्तांना सादर करायचा आहे.

हेही वाचा

पुणे जिल्हयातील नागापूर येथे समाजकंटकाने कांदा बराकीत टाकला युरिया

नागपूर : नोकरीसाठी बोलावले अन् गुंगीचे औषध देत दोघांनी केला बलात्कार

पुणे : स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी दगडाला धडकली ; 70 ते 75 प्रवासी बालंबाल बचावले

Back to top button