नाशिक : अखेर ‘धुलाई’त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली | पुढारी

नाशिक : अखेर 'धुलाई'त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने उघडकीस आणले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडे ६७ लाख रुपयांच्या बिलांपैकी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराने बिलांची पाहणी करीत गैरव्यवहार झाल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे शासनाने रोखून ठेवलेले बिले शासन जमा करण्यास मान्यता दिली असून, उर्वरित बिलांची रक्कम परत करण्यासाठी मुदत मागितली आहे.

ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत तीन वर्षांत ६७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा रुग्णालयाने ठेवत संबंधित ठेकेदाराकडे ३० लाखांची वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर ठेकेदाराने जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाकडे संबंधित चौकशीची व गैरव्यवहार झालेल्या बिलांची मागणी केली. या बिलांची पडताळणी करून ठेकेदाराकडून उत्तर अपेक्षित होते. त्यानुसार ठेकेदाराने प्रशासनास लेखी लिहून गैरव्यवहार झाल्याचे कबूल केल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच ६७ लाखांपैकी ३७ लाखांचे बिल शासनाने गोठवले आहे. हे पैसे शासनजमा करून घेण्यास ठेकेदाराने संमती दिली आहे. तर ठेकेदारास दिलेले ३० लाखांचे बिल पुन्हा शासनाकडे देण्यास ठेकेदाराने मुदत मागितल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ठेकेदाराने लेखी स्वरूपात ३७ लाखांचे बिल वळते करण्यास सांगितले आहे. तर उर्वरित ३० लाख रुपयांच्या बिलासाठी मुदत मागितली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित बिल वसुलीसंदर्भात मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. – डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक.

हेही वाचा:

Back to top button