Titanic tourist submarine : टायटॅनिक पाहायला गेलेल्या बेपत्ता पाणबुडीत ३० तासांपेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक | पुढारी

Titanic tourist submarine : टायटॅनिक पाहायला गेलेल्या बेपत्ता पाणबुडीत ३० तासांपेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील सर्वात लोकप्रिय जहाज टायटॅनिकचे (Titanic tourist submarine) अवशेष दाखवण्यासाठी मध्य अटलांटिक महासागरात रविवारी (दि.१८) पर्यटकांना घेऊन गेलेली पाणबुडी अद्यापही बेपत्ता आहे. ही पाणबुडी कॅनडाच्या न्यूफाउंडलँड किनाऱ्याजवळ बेपत्ता झाली होती. या पाणबुडीमध्ये ३० तासांपेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक आहे, असा दावा सरकारी यंत्रणांनी केला आहे. बेपत्ता पाणबुडी ही ओशियन गेट कंपनीची टायटन सबमर्सिकल आहे. ती आकाराने एका ट्रकएवढी आहे. आपात्कालीन परिस्थितीचा विचार करून पाणबुडीमध्ये चार दिवसांपुरता ऑक्सिजन साठा असतो. परंतु आता ३० तासांपेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक राहिल्याने चिंता वाढली आहे.

टायटॅनिकचे (Titanic tourist submarine) अवशेष सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड, कॅनडाच्या दक्षिणेस ७०० किमी अंतरावर आहे. अमेरिकन शहर बोस्टनमधून ही बचाव आणि शोध मोहीम सुरू केली आहे. ही पाणबुडी शोधण्यात आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी झाल्या आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, बचाव कार्य अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. जर पाणबुडीचे नेमके ठिकाण समजले. तर आम्ही आमच्या सामर्थ्याच्या बळाबर पाणबुडी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करू.

पाणबुडी ज्या ठिकाणाहून गायब झाली. त्या ठिकाणाहून मोठा आवाज ऐकू आला, जो कित्येक तास सुरू होता, अशी माहिती यूएस होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या सूत्रांनी दिली. पाणबुडीमध्ये केवळ ३० तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याने पाणबुडी शोधण्यासाठी बचाव पथकाला वेळ लागत आहे. मध्य अटलांटिकच्या खोल पाण्यात बचाव कार्य सुरू आहे. परंतु अद्याप ठोस काहीही हाती लागलेले नाही.

यूएस कोस्ट गार्डचे कॅप्टन जेमी फ्रेडरिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाणबुडीचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. परंतु अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही. ही शोधमोहीम खोल पाण्यात सुरू असल्याने अत्यंत किचकट झाली आहे.

यूएस आणि कॅनडाच्या एजन्सी व्यतिरिक्त, नौदल, व्यावसायिक खोल समुद्रात उतरणाऱ्या कंपन्या देखील या शोध आणि बचाव मोहिमेत सामील झाल्या आहेत. लष्करी विमाने, पाणबुड्या आणि सोनार बॉय मशीनसह पाणबुडीचा शोध घेत आहेत. अनेक खासगी जहाजेही त्यांना यामध्ये मदत करत आहेत.

या पाणबुडीवर पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान, ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग यांच्यासह पाच जण आहेत. त्याचबरोबर ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, फ्रेंच संशोधक पॉल हेन्री नार्गेलेट हे देखील या पाणबुडीत आहेत.

हेही वाचा 

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या लोकांची पाणबुडी बेपत्ता

Titanic tourist submarine : टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या पानबुडीत पाकिस्तानच्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश

Leonardo DiCaprio Dating Neelam Gill : टायटॅनिकचा जॅक देशी रोझच्या प्रेमात; लिओनार्डो डीकॅप्रिओ पंजाबी मॉडेलला करतोय डेट

 

Back to top button