Thane : नेवाळी डावलपाडा येथे एमआयडीसीने खोदलेल्या खड्ड्यात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू  | पुढारी

Thane : नेवाळी डावलपाडा येथे एमआयडीसीने खोदलेल्या खड्ड्यात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू 

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : नेवाळी (डोंबिवली) येथील डावल पाडा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून एमआयडीसी परिसरात पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी खड्डा खणला होता. या खड्ड्यात पाणी साचले होते. या खड्ड्याजवळून जात असताना दोन चिमुरड्यांना खड्डा दिसला नाही. खड्ड्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. सनी यादव (वय वर्षे ८) आणि सुरज मनोज राजभर (वय वर्षे ७) अशी मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत.

माहितीनूसार, एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खड्डा खणला होता. या खड्ड्याच्या आजूबाजूला सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. खड्ड्याच्या बाजूने जात असताना सनी आणि सूरज यांचा पाय घसरून ते खड्ड्यात पडले. आणि बुडून मृत्यू झाला. एमआयडीसीच्या ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्यानेच मृत्यू झाला असल्याचा आरोप या चिमुरड्यांच्या नातेवाईकांनी केला. दोघांचेही मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.  माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी नातेवाईकांची भेट घेत समजूत घातली.  अद्याप एमआयडीसी ठेकेदार घटनास्थळी न आल्याने  नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा 

Back to top button