काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त, मी सर्वसामान्‍यांच्‍या कार्यात व्‍यस्‍त : पंतप्रधान मोदींचा हल्‍लाबोल | पुढारी

काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त, मी सर्वसामान्‍यांच्‍या कार्यात व्‍यस्‍त : पंतप्रधान मोदींचा हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे; पण मोदी बंगळूर-म्‍हैसूर एक्सप्रेस वे बनवण्यात आणि सर्वसामन्‍यांच्‍या जीवनात आनंद निर्माण करण्‍यासाठी व्यस्त आहे, अशा शब्‍दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. १२) काँग्रेसवर हल्‍लाबोल केला. बंगळूर-म्हैसूर एक्सप्रेस वे आणि विविध कामांचा लोकार्पण सोहळाप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.   (PM Modi)

या वेळी पंतप्रधान मोदी म्‍हणाले, “२०१४ पूर्वी काँग्रेसने गरीब जनतेला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. काँग्रेस सरकारने गरीब जनतेचा पैसा लुटला, बंगळूर-म्‍हैसूर एक्सप्रेस  वेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशाची प्रगती पाहून तरुणांना अभिमान वाटत आहे. हे सर्व प्रकल्प विकास आणि समृद्धीच्या नव्या युगाला सुरुवात करत आहेत. बंगळूरआणि म्हैसूर ही कर्नाटकातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. त्यामुळे ही दोन्ही शहरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडणे महत्त्वाचे आहे.”  (PM Modi)

राष्ट्रीय महामार्ग २७५ च्या ११८ किमी लांबीचा बंगळूर-म्‍हैसूर एक्सप्रेसवे सुमारे ८,४८० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. यामुळे दोन्‍ही शहरांमधील प्रवासाची वेळ आता तीन तासांवरून ७५ मिनिटांवर आली आहे.  बंगळूर-म्‍हैसूर असा हा सहा पदरी एक्सप्रेस वे आहे.

हेही वाचा

Back to top button