Valentine’s Week : लाल गुलाबच्या सोबतीने कंडोमची तुफान विक्री!

Valentines day
Valentines day
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी देशातील मोठ्या शहरांत कंडोम, परफ्युमच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय पुरुषांसाठीचे डिओडरंट, महिलांसाठीचे परफ्युम्स, गुलाब, चॉकलेट, मेणबत्त्या यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. फक्त व्हॅलेंटाईन डेच नाही तर संपूर्ण आठवड्यात या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

Blinkit या ईकॉमर्स साईटने या संदर्भातील आकडेवारी ट्विटरवर शेअर केलेली आहे. याशिवाय Zepto, Dunzo, Instamart या इकॉमर्स साईटवरही व्हॅलेटाईन डेशी संबंधित गिफ्ट आणि इतर वस्तूंच्या खपात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

Dunzo या ईकॉमर्स साईटवर कंडोम आणि इतर प्रॉडक्टच्या खपात ४० टक्के वाढ नोंदवली होती, अशी बातमी बिझनेस स्टँडर्डने दिली आहे. या शिवाय रोझ डेच्या दिवशी गुलाब तर चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेटच्या खपात २५ टक्के वाढ नोंदवली गेली.

Blinkitवर चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेटच्या २००० ऑर्डर नोंदवण्यात आल्या होत्या. याशिवाय १० हजार गुलाब, १२०० बुके यांची विक्री या अॅपवर झाली आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी दिली आहे. Blinkit वरील ३० टक्के ऑर्डर या इतरांना गिफ्ट देण्यासाठी होत्या, असे त्यांनी म्हटले आहे.

तर Zepto वर २ लाख गुलाबांची विक्री व्हॅलेंटाईन आठवड्यात झाली आहे. तर चॉकलेट, कुकीज, कँडी यांची विक्री नेहमीच्या तुलनेत दुप्पट झाली होती. शिवाय सॉफ्ट टॉईजच्या विक्रीत १० पट वाढ नोंदवण्यात आली. मेकअप आणि ब्युटीकेअरशी संबंधित उत्पादनांत ५० टक्के वाढ नोंदवण्यात आल्याचे Zeptoच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news