दिलासादायक : भारतात मंदीचा धोका कमी – RBIचे गव्हर्नर दास | पुढारी

दिलासादायक : भारतात मंदीचा धोका कमी - RBIचे गव्हर्नर दास

भारतात मंदीचा धोका कमी - RBIचे गव्हर्नर दास

पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतात मंदीचा धोका कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक आणि पॉलिसी रिसर्चमध्ये आयोजित वार्षिक परिषदेत ते बोलत होते.

जगभरात मंदीची भीती व्यक्त होत असताना दास यांचे भारताबद्दलचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मागणीत आव्हाने आहेत, पण तसे असले तरी भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिलेली आहे. कोव्हिड १९ महामारी, युरोपमधील युद्ध आणि विविध देशांत वाढत असलेले व्याजदर ही ३ आव्हाने आहेत. अर्थविषयक संशोधनापुढे या घटकांनी वेगळी आव्हाने उभी केली आहेत, असे ते म्हणाले.

“विकसित राष्ट्रांत महागाई ही मोठी समस्या बनली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ केल्याने अमेरिकी डॉलर वधारत आहे. विकसनशील राष्ट्रांत जी समस्या दिसते भांडवल बाहेर जाणे, चलनाचे अवमूल्यन, चलन साठ्यात घट इत्यादी स्वरुपाच्या आहेत.”

हेही वाचा

Back to top button