औरंगाबाद : बनावट नोटा देऊन फसवणूक प्रकरणी चौघांना पुन्हा पोलीस कोठडी | पुढारी

औरंगाबाद : बनावट नोटा देऊन फसवणूक प्रकरणी चौघांना पुन्हा पोलीस कोठडी

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या नऊ आरोपींना न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. औरंगाबाद येथील मुजफ्फर शेख यांना ३९ लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या ११ आरोपीं पैकी नऊ आरोपींना औंढा पोलिसांनी अटक केली होती. ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत आरोपींकडून औंढा पोलिस फरार आरोपींचा शोध घेऊ शकली नाही. त्याच प्रमाणे आरोपींनी फिर्यादी कडून घेतलेला मुद्देमालची पुनर्प्राप्तीही करता आली नाही. आज (दि.७) आरोपींची पोलीस कोठडी संपल्या मुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. औंढा न्यायालयाने पाच आरोपींना दिलासा देत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर ज्ञानप्रकाश परमेश्वर जागींड, केशव विश्वनाथ वाघमारे , लखन गोपाल बजाज, राहुल चंदूसिंग ठाकूर या चार आरोपींना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का? 

 

Back to top button