औरंगाबाद : धम्म पद यात्रेचे शहरात आगमन; बुद्ध अस्थिकलशच्या दर्शनासाठी मोठी गर्दी | पुढारी

औरंगाबाद : धम्म पद यात्रेचे शहरात आगमन; बुद्ध अस्थिकलशच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : थायलंड येथील भंते लोंगफुजी यांच्यासह ११० भिखू संघाचे बुद्धांच्या अस्थी कलशसह गुरुवारी (दि.२६) रात्री औरंगाबाद शहरात आगमन झाले. रात्रभर केंब्रिज चौकात मुक्काम करून शुक्रवारी (दि.२७) सकाळी पद यात्रेला सुरुवात झाली. यावेळी जागोजागी बौध्द अनुयायांनी बुद्धांच्या अस्थी कलशाचे दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अमरप्रित चौकात बुद्धाचा अस्थिकलश दर्शनसाठी ठेवण्यात आल्या. तेथेच उपासक-उपासिकांना भिक्खूसंघानी धम्मदेसना दिली. या सोहळाला उपासक-उपासिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही धम्म पदयात्रा परभणीहून निघाली असून चैत्यभूमी (दादर) मुंबई येथे जाणार आहे.
या पदयात्रेत ११० थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू तसेच भारतातील भिक्खू संघ, उपासक यात सहभागी झालेले आहेत. याशिवाय प्रसिध्द सिनेअभिनेते गगन मलिकही पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. हॉटेल अमरप्रित येथील धम्मदेस्नेनंतर ही पद यात्रा तिसगावकडे रवाना होणार आहे. येथे पदयात्रेतील सहभागी भिक्खू संघ व उपासकांचा मुक्काम राहणार असून शनिवारी (दि.28) ही पद यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे.
हेही वाचा 

Back to top button