औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात तब्बल ७०० जणांना विषबाधा | पुढारी

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात तब्बल ७०० जणांना विषबाधा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात तब्बल ७०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.५) रोजी समोर आला. रुग्णांना घाटीसह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाह सोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र, याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. पाहता-पाहता अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेत तब्बल ७०० जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक जणांना गंगापूरला रुग्णालयात तर २२ जणांना घाटीतील रुग्णालयात दाखल केले होते. तर रूग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाची प्रकडती गंभीर आहे. काही रुग्ण एमजीएम रुग्णालयात दाखल केले गेले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button