महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख यांचे निधन | पुढारी

महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख यांचे निधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेत राहून मराठी संस्कृती फुलवण्यात मोठे योगदान देणारे महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख (वय ७३) यांचे ४ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास (अमेरिकेतील वेळेनुसार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. सांगलीहून अमेरिका गाठल्यानंतर कर्तृत्व गाजवणारा चेहरा अशी देशमुख यांची ओळख होती.

सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेलेल्या तरुणांमध्ये देशमुख यांचे नाव प्रामुख्याने घेतले गेले. सांगली ते फ्लोरिडा असा त्यांचा प्रवास होता. ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून अमेरिकेत जाऊन कर्तृत्व गाजवणाऱ्या तरुणांपैकी एक असलेल्या सुनील देशमुख यांनी विशेष पुढाकार घेऊन महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) संस्थेची स्थापना केली. फाउंडेशनच्या वतीने ११९४ पासून मराठी साहित्य पुरस्कार तर १९९६ पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. दरवर्षी दहा ते अकरा याप्रमाणे गेली २८ वर्षे पुरस्कार नित्यनेमाने दिले जात आहेत.

Back to top button