पिंपळनेर : ‘प्रहार’च्या पाठपुराव्याने मिळाला एक लाख रुपयाचा धनादेश | पुढारी

पिंपळनेर : 'प्रहार'च्या पाठपुराव्याने मिळाला एक लाख रुपयाचा धनादेश

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील पेरेजपुर येथील कै. किशोर गुलाबराव कुवर (34) या तरुण शेतकऱ्याने बँकेकडून चार वर्षांपासून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे कुवर यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याने जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई-वडील यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, ‘प्रहार’च्या पाठपुराव्याने पिडीत कुटुंबाला एक लाख रुपयाचा धनादेश मिळाला आहे.
कै. किशोर यांचा मृत्यू झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, शहर अध्यक्ष पंकज पवार व दिव्यांग संघटनेचे संजय पाटील (धाडणे) तसेच नगरपंचायतचे नगरसेवक बाळासाहेब मुकेश शिंदे यांच्या कडून देखील विशेष प्रयत्न करण्यात आले. सातत्याने तहसीलदार प्रवीण चव्हाण यांनी पाठपुरावाचा सपाटा सुरूच ठेवला. गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजनेमधून एक लक्ष रुपये धनादेश व डीडी स्वरूपात देण्यात आले. पीडित कुटुंबाला अर्थसहाय्य मिळाल्याने कुवर यांची पत्नी दीपाली कुवर यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. यावेळी संघटनेचे जयेश बावा, विकास मोहिते, रुपेश सोनार, राजू भदाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button