Shami Replace Bumrah : टी-२० विश्वचषकासाठी बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला संधी; बीसीसीआयची घोषणा | पुढारी

Shami Replace Bumrah : टी-२० विश्वचषकासाठी बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला संधी; बीसीसीआयची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी टी-२० विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. मोहम्मद शमीचा भारताच्या अंतिम १५ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला होता. यानंतर मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. याबाबत माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (Shami Replace Bumrah)

याबाबत बीसीसीआयने म्हटले आहे की, अखिल भारतीय वरिष्ठ निवड सिमितीने मोहम्मद शमीला टी२० विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी संधी दिली आली आहे. मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. ते लवकरच ऑस्ट्रेलियात दाखल होतील. (Shami Replace Bumrah)

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल.राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल (Shami Replace Bumrah)

बुमराहची कमी शमी भरून काढणार? (Shami Replace Bumrah)

मोहम्मद शमीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चा किताब आपल्या नावावर केला होता. दरम्यान गतवर्षीच्या विश्वचषकानंतर मोहम्मद शमी भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. त्याने आयपीएल २०२२ मध्ये २० विकेट्स पटकावल्या होत्या. शिवाय शमीला ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहची कमी मोहम्मद शमी भरून काढेल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. (Shami Replace Bumrah)

असे आहे मोहम्मद शमीचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड

मोहम्मद शमीने आत्ताप्रर्यंत भारतासाठी ६० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २१६ विकेट्स पटकावल्या आहेत. तर भारतासाठी ८२ एकदिवसीय सामने खेळून त्याने १५२ बळी घेतले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याला लौकीकाला शोभेल अशी कामगिरी करता आली नाही. मोहम्मद शमीने भारताकडून १७ टी-२० सामने खेळत १८ विकेट्स पटकावल्या आहेत. (Shami Replace Bumrah)

हेही वाचलंत का?

Back to top button