Crime News : धक्कादायक! कर्नाटकात 15 वर्षीय मुलाला कपडे न घालता पूजा करायला भाग पाडले | पुढारी

Crime News : धक्कादायक! कर्नाटकात 15 वर्षीय मुलाला कपडे न घालता पूजा करायला भाग पाडले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Crime News : कर्नाटकात एका 15 वर्षीय मुलााला कपडे न घालता पूजा करायला भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोप्पल ग्रामीण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Crime News : शरणप्पा निंगाप्पा तलवार, विरुपनगौडा सिद्दनगौडा गौद्रा (दोघेही हसगल येथील) आणि मेटागलचे शरणप्पा बोजप्पा ओजानहल्ली अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. आरोपींवर आयपीसी आणि बाल न्याय कायद्याच्या अनेक कलमांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलाला सांगितले की त्याने जर नग्न होऊन पूजा केली तर त्याच्या वडिलांचे सर्व कर्ज माफ होईल आणि लगेच पैसे मिळतील. त्यानंतर त्यांनी त्याला हुबळी येथील लॉजवर नेऊन त्याला नग्न होऊन पूजा करायला भाग पाडले. सोबतच आरोपींनी याचे संपूर्ण चित्रिकरण केले. ही घटना जूनमध्ये घडली. मात्र, व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर आता व्हायरल झाली.

Crime News : पीडित मुलाला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हे समजल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलगा व त्याच्या पालकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गोवा : ‘पीएफआय’चा म्होरक्या अनिस कर्नाटकात जेरबंद

फोनपे कार्यालय गेले कर्नाटकाला; वेदान्त-फॉक्सकॉननंतर राज्याला आणखी एक धक्का

Back to top button