फोनपे कार्यालय गेले कर्नाटकाला; वेदान्त-फॉक्सकॉननंतर राज्याला आणखी एक धक्का | पुढारी

फोनपे कार्यालय गेले कर्नाटकाला; वेदान्त-फॉक्सकॉननंतर राज्याला आणखी एक धक्का

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वेदान्त-फॉक्सकॉननंतर आता फोन पेचे कार्यालय कर्नाटकाला हलविण्याचा निर्णय झाला आहे. त्यासंदर्भातील कंपनीची जाहिरात गुरुवारी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाल्या आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये अजूनही वाद सुरु असताना पुन्हा राज्याला आणखी एक धक्का बसला.

फोन पेचे मुंबईतील अंधेरी येथील कार्यालय कर्नाटकामध्ये हलविण्यात आल्याबाबतचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांना सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा आणखी एक नवा मुद्दा मिळाल्याचे दिसत आहे. फोन पे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आता कर्नाटकला हलवण्यात येणार असल्याने यासंदर्भातील ही सूचना कंपनीच्या गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे.

कंपनीच्या नोटीसमध्ये काय?

फोनपेचे संचालक आदर्श नहाटा यांनी या नोटीसमध्ये, कंपनीचे कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, 2012 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.

Back to top button