आंजर्ले समुद्रात एका बोटीला जलसमाधी, सर्व खलाशी सुखरूप | पुढारी

आंजर्ले समुद्रात एका बोटीला जलसमाधी, सर्व खलाशी सुखरूप

दापोली; पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एका मच्छिमार बोटीला जलसमाधी मिळाली. वासुदेव दोरकुलकर यांची बोट पूर्णपणे समुद्रात बुडाली तर प्रकाश दोरकुलकर यांच्या बोटीला स्थानिक मच्छीमार व आंजर्ले गावकऱ्यांनी किनाऱ्यावर आणले आहे. या बोटीतील खाडीत उडी टाकल्याने ५ खलाशी बचावले. आमावस्या असल्याने समुद्र खवळला आहे. त्यातच आंजर्ले समुद्रामध्ये बोट बुडाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

सोमवारी (दि. ६) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली.

रत्नागिरीमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. तर हवामान खात्याने देखील पावसाचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव दोरकुळकर यांची बोट क्रमांक- ७२४ सिद्धिसागर नावाची दोन सिलेंडरची बोट बुडाली. सर्व खलाशी सुखरूप असून दोघेजण पोहत-पोहत वर आले तर दोन खलाशी दुसऱ्या बोटीने वाचविण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे. तर यादरम्यान एक बोट बुडाली.

दरम्यान, या घटनेचे माहिती मिळताच बंदर अधिकरी दीप्ती साळवी आणि काही अधिकारी, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचलं का? 

पाहा : मुंबईचा प्रसिद्ध खातू कारखाना यावर्षी सुना सुना |

Back to top button